– अभियान दरम्यान आयईडी स्फोट, परिसरात खळबळ
The गडविश्व
नारायणपूर, २६ फेब्रुवारी : नक्षलविरोधी अभियाना दरम्यान आयईडी स्फोट झाल्याने आयईडीच्या स्फोटात एक जवान शहीद झाल्याची घटना पुढे येत आहे. संजय लकडा असे शहीद जवानाचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सीएएफ, डीआरजीची संयुक्त पार्टी नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ओरछा येथील बटुम भागात नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान शोध घेत असताना नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेल्या आयईडीवर जवान संजय लकडा यांचा पाय पडला व स्फोट झाला यात संजय लकडा हे शहीद झाले. शहीद जवान हे नारायणपूर जिल्ह्यातील सीएएफ (छत्तीसगड आर्म फोर्स) च्या 16 व्या बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते
एएसपी हेमसागर सिदार यांनी सांगितले की, येथे जवानाला अखेरचा निरोप दिल्यानंतर त्यांचे पार्थिव जशपूर येथील बाम्हणपुरा येथे पाठवले जाईल. माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Chhattisgarh | A Head Constable was killed in an IED blast planted by Naxals in Narayanpur District under Orchha PS Limit: SP Narayanpur Pushkar Sharma
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 26, 2023
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Crystal Palace vs Liverpool) (Jake Paul vs Tommy Fury) (Real Madrid vs atlético Madrid) (Bournemouth vs Man City) (Leicester City vs Arsenal) (Sergio Ramos) (The Gdv)