The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑक्टोबर : उद्योग व उद्यमशिलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ अधिका अधिक उद्योजकांना मिळावा व जिल्हयातील निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, एम.सी.ई.डी., सिडबी, आयडीबीआय कॅपिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होटेल लॅन्डमार्क, येथे गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन यावर सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमावर इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोलीचे अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, यांनी प्रमुख पाहण्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम अति.जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांनी जिल्हयातील उद्योगांना, नव उद्योजकांना, शेतकरी सहकारी संस्था व जिल्हयाच्या विकासात्मकदृष्टीने कसा भर देता येईल याबाबत सदर कार्यशाळेस मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस आशिष मुनघाटे-व्यवस्थापक सिडबी यांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी सिडबी अंतर्गत असलेल्या योजनांची माहिती दिली. जी.बी.लाडे-उद्योग उपसंचालक, मुंबई यांनी मैत्री पोर्टल व मैत्री कायद्याबध्दल माहिती दिली. मैत्री कायद्या अंतर्गत एक खिडकी योजने अंतर्गत एकाच ठिकाणी उद्योग व्यवसायीकांना विविध विभागाच्या परवानगी मिळणार आहे असे सांगीतले. उमेश रनोलीया-वरिष्ठ कार्यकारीयांनी आयडीबीआय कॅपीटल बध्दल मार्गदर्शन केले. कार्तिक – सिपेट चंद्रपूर यांनी प्लॉस्टीकचे पूर्नवापर करुन वेगवेगळया वस्तू निर्माण करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. श्रीमती गोदावरी लोणार-झेड फॅसीलेटर यांनी झेड प्रमाणपत्राबाबत माहिती दिली. मनिष गणविर यांनी बार्टी अंतर्गत घेण्यात येणा-या प्रशिक्षणाबध्दल सविस्तर माहिती दिली. पंकज कामडी-मार्केटींग एक्झीकेटीव्ह इंडिया पोस्ट डाकघर निर्यात केंद्राबध्दल माहिती दिली. युवराज टेंभूर्णे- जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक यांनी एमएसएमई योजना व कर्ज प्रकरणाबातची माहिती दिली. कृषि अधिक्षक, बस्वराज मास्तोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस आरसेटी, कैलास बोनगीरवार, माविम, सचिन देवतळे, कौशल्य विकास, शेन्डे केव्हीआयबी, भास्कर मेश्राम हे उपस्थित होते.
जिल्हयातील लघु उद्योगांना चालना मिळावी व निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत १५० हून अधिक उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्यागिक समुह, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक सदर कार्यशाळेत उपस्थित होते.
सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता नरेन्द्र घुमारे, शरद मेश्राम, अभिषेक पाटोळे, कु.पुनम कुसराम, कालीदास खेडेकर, बापू टेकाम, कु.सुनिता मडावी, देविचंद मेश्राम, जितेन चौरे यांनी सहकार्य केले.