– दोघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : तालुक्यातील येरकड पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या जेवलवाई येथे आज ७ सप्टेंबर ला अवैध वाहतूक करणारे जनावरांचे बोलेरो पिकअप पोलिसांनी पकडून कारवाई केली. सदर कारवाईने अवैध जनावरे तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यावेळी दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केंद्र येरकड अंतर्गत येत असलेल्या जेवलवाई येथे अवैध जनावरे घेऊन जाणारे पिकअप एमएच ३३ जी १५५४ हे पोलिसांनी पकडले. त्यात दोन आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. त्यात जावेद अहमद अली, गुरुदेव गोपीचंद नकाते या दोघांवरती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा १८३, १७७ भांदवी ३४ अंतर्गत प्राणी हत्या प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ११ व १२ अन्वये कारवाई करण्यात आली. वाहनात अवैध असलेल्या तिन रेड्यांना चंद्रपूर येथील गोशाळेमध्ये पाठविण्यात आले. येरकड येथील पोलिसांच्या धडक कारवाईत जनावरे चोरुन तस्करी करणाऱ्या चोरट्याचे सध्या तरी धाबे दणाणले आहे.