– आष्टी पोलीस स्टेशनची धडक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, ३१ ऑगस्ट : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारु वाहतुक केली जात असतांना आष्टी पोलिसांनी वाहनासह ११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची धडक कारवाई ३१ ऑगस्ट रोजी केली. सदर कारवाईने अवैध दारू तस्करांचे व विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातील आरोपी मात्र फरार झाले आहे.
पोलीस अधिक्षक निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. आज ३1 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा, उपविभागिय पोलीस अधिकारी, अहेरी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आष्टीचे प्रभारी अधिकारी कुंदन गावडे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन पोउपनि. पवार, सफौ/काळे, पोहवा/करमे, पोअं/नागुलवार, पोअं/तोडासे, पोअं/गोडबोले, पोअं/रायशिडाम, पोअं/ पंचफुलीवार असे मार्कंडा कंसोबा फाटा येथे नाकाबंदी करीत असतांना, गोंडपिपरी ते आष्टी या मार्गे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. एम एच ३० ए बी २६०२ ही आल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफने थांबविण्याचा ईशारा दिला. परंतू वाहन चालक वाहन न थांबविता आलापल्ली रोडने निघुन गेला. त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहनाचा पाठलाग केला असता, बोलेरो पिकअप वाहन चालक मौजा चंदनखेडी (वन) येथील रस्त्यावर वाहन उभी करुन जंगलात पसार झाला. त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ९० एम एल मापाचे ५५ सिलबंद बॉक्स किंमत ५,५०,००० रुपये, ३७५ एम एल मापाचे ०५ सिलबंद बॉक्स किंमत ७२,००० रुपये, बोलेरो मॅक्सी ट्रक बनावट वाहन क्रमांक एम एच ३० ए बी २६०२ किंमत ५,००,०००/- रुपये असा एकुण ११,२२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्रात जप्त केलेले वाहन क्रमांक हे बनावटीकरण असल्याचे व अज्ञात चालक हा जंगलाचा फायदा घेवुन फरार झालेला असल्याचे दिसुन आल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम ४६५ भादंवी, सहकलम ६५ (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास पोउपनि. मानकर करीत आहेत.