– ग्राइंडर चालकाला न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १६ फेब्रुवारी : पुराडा ते मालेवाडा मार्गावरील रस्त्याच्या खांद्याचे अवैधरित्या काम करत असलेल्या कामावर कारवाई करत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र १ गडचिरोली, इतर अधिनस्त अभियंतासह व काम करीत असलेल्या ग्राइंडर चालकाविरुद्ध वनगुन्हा नोंदवून ग्राइंडर जप्त करण्यात आला. सदर कारवाई १६ फेब्रुवारी रोजी पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बि.एच.डिघोळे यांनी केली. याप्रकरणी ग्राइंडर चालकास न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय कुरखेडा येथे हजर केले असता न्यायालयाने २८ फेब्रुवारी पर्यंत एमसीआर मंजूर करून आरोपीची जिल्हा कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.
वन परिसरातून रस्ता बांधकाम करण्याकरिता विशेष नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. वडसा वनविभागातील वनपरिक्षेत्र पुराडा मधील कक्ष क्रमांक १०४० मधून पुराडा ते मालेवाडा डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अवैधरित्या मुरूम पसरवून खांद्याचे बांधकाम करण्याचे काम सुरू होते. सदर बाब पुराडा चे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) बि.एच. डिगोळे यांना कळताच कारवाई करत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ गडचिरोली व इतर अधिनस्त अभियंते तसेच सदर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर काम करीत असलेल्या ग्राइंडर चालक राजू रविदास (३१) रा. अल्पितो, हजारीबाग झारखंड यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ग्राइंडर चालकास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ फेब्रुवारी पर्यंत एमसीआर मंजूर करून नागपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुढील तपास पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बि.एच.डिघोळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
(The Gaevishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Forest) (Purada Malewada) (RFO B H Dighole)