आरमोरी शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारु, सट्टापट्टी व सुगंधीत तंबाखू व्यवसाय त्वरित बंद करा

304

– मनसे ची निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ७ जून : आरमोरी तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना उत आलेले दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून सुद्धा आरमोरी शहरात विषारी दारूची विक्री खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच अवैध सट्टापट्टी व बनावट सुगंधी तंबाखू व्यवसायाला उत आलेला आहे यामुळे शहरातील युवक दारूच्या आहारी जाताना दिसत आहेत तसेच बनावट सुगंधित तंबाखूच्या विक्रीने लहान विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला पान टपरीवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत आहे. या समाजविघातक कृत्यावर आळा घालुन दारू विक्रेते, सट्टापट्टी व्यवसायिक व तंबाखू व्यवसायिकांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीतजी बनकर , मनसे महिला आघाडी च्या तालुकाध्यक्षा विभाताई बोबाटे, मनसे तालुकाध्यक्ष आशुतोष गिरडकर, तालुका उपाध्यक्ष प्रथमेश साळवे, तालुका संघटक राकेश सोनकुसरे, तालुका उपाध्यक्षा ज्योतीताई बघमारे, शहर अध्यक्ष लिलेश साहारे, शहर उपाध्यक्ष गणेश तिजारे, शहर संघटक तेजराव चिलबुले यांनी निवेदनातून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here