कुरखेडा तालुक्यातील कृषी पंपाचा विद्युत पूरवठा सूरळीत करा

616

– तहसीलदार, विद्युत सहाय्यक अभियंता व पोलीस स्टेशन यांना दिले निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १० : तालुक्यातील अनेक गावात मागील आठ दिवसापासून विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामस्थ व शेतकरी बांधव त्रस्त झाले आहे. हा विद्युत पूरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणी करीता शुक्रवार ९ फेब्रूवारी रोजी तालुक्यातील जांभूळखेडा, कुंभिटोला, उराडी, सोनेरांगी, जाभंळी, सावलखेडा, वासी, कढोली व गांगोली येथील शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी नवनियुक्त तहसीलदार रमेश कुंभरे, विद्युत विभागाचे सहायक अभियंता मुरकुटे व ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्फतीने राज्याचे उर्जा मंत्री तथा उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले व समस्या मार्गी न लागल्यास विद्युत मंडळा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मागील आठ दिवसापासून तालुक्यातील अनेक फिटरवर लोड नियंत्रणाच्या नावाखाली भारनियमन लावल्या जात असल्याने त्याचा फटका घरगूती विद्युत ग्राहकांना व कृषीपंप धारकांना होत आहे. विद्युत पुरवठा दिवसातून अनेकदा खंडित केल्या जात असल्यामुळे रब्बी धान पीक, मका पीक धोक्यात आले आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना व घरगूती विद्युत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच २४ तास विद्युत पूरवठा निश्चित करण्यात यावा या मागणी करीता शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने येथील तहसील कार्यालय मार्फत राज्याचे उर्जा मंत्री तथा उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवत मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती व्‍यंकटी नागीलवार, सरपंच बाबुरावजी कुंभरे, राधेश्याम दडमल, सुरेश चौधरी, विवेक कोकडे, गुरुदेव निकोडे, नीताताई घोडाम, जांभुळखेडा सरपंचा राधाताई हलामी, उपसरपंच गणपत बनसोड, वामन ठलाल, येनीदास कवरके, अशोक कवरके, ईश्वर भोयर, नथुजी दखणे, झुलाराम नाकाडे, देवाजी नंदेश्वर, टिकाराम चौके, चंद्रकांत चौके, मधुकर निमजे, पुंडलिक मानकर, मोहन मडावी, वामन वाघमारे, प्रकाश मोरे, मिथुन मानकर, एस.पी रणदिवे, नेताजी निमजे व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here