The गडविश्व
भामरागड, २२ फेब्रुवारी : स्थानिक नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदाची एक वर्षाच्या मुदत संपल्याने २१ फेब्रुवारी रोजी सभापती निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे चार सभापती पदे अविरोध निवडून आल्याने भामरागड नगरपंचायतमध्ये आविसं व अजयभाऊ मित्र परिवार चे एक हाती सत्ता बसला. यामध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून कुमारी. तेजस्विनी मडावी, बांधकाम सभापती पदी विष्णू मडावी, आरोग्य व स्वच्छता सभापती पदी सौ. कविता येतमवार, पाणी पुरवठा सभापती म्हणून कुमारी. सचिरेखा आत्राम हे अविरोध निवडून आले आहेत.
यांच्या निवडीने अविस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.