गडचिरोलीत : शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार

154

– जिल्हयात “शासन आपल्या दारी” उपक्रमातून ६.३२ लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत
The गडविश्व
गडचिरोली, २ जुलै : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.32 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. त्यामुळे त्यांना आता शासनाच्या इतरही योजना घेणे सोयिस्कर होणार आहे. कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. गडचिरोली जिल्हयातील जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ८ जुलै रोजी गडचिरोली येथे येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विद्यालयाच्या प्रांगणत आयोजित केले जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने विविध गावातील लाभार्थी सहभागी होणार आहेत.
सर्वसामान्यांना शासकीय दाखले जसे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रीमीलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नाव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळया 33 योजनांमधील योजना सेवांचा लाभ गडचिरोली जिल्हयात दिला आहे. राज्यात सर्वांत चांगली कामगिरी या उपक्रमात गडचिरोली जिल्हयाने केली आहे.
(the gadvishva, the gdv, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here