The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०४ : तालुक्यातील कसारी येथे आदिवासी गोटूल समीती, वन-जन-हक्क फांऊडेशन तथा मेडिट्रीना हास्पीटल व एच सी जी कैंसर रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोज शनिवार ३ फेब्रूवारी रोजी दूपारी १ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ५५० रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले तर ५० युवकांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
शिबीराचे उदघाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले. शिबीरात रुग्णांची अनेमिया,अस्थिव्यंग,बालकफ, शल्यक्रिया, कर्करोग तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले तसेच मोफत विविध रक्त तपासणी,ईसीजी, शूगर तपासणी करण्यात आली. यावेळी नागपूर येथील डॉ.आशिष कोरेटी यांनी मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व विषद केले तसेच स्वस्थ जीवन जगण्याकरीता आरोग्याची निगा कशी राखावी ही माहिती विषद केली तर डॉ. केशव वालके यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगत यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले. शिबीरात डॉ.आशिष कोरेटी, डॉ.प्रशिल उईके, डॉ.वेद सारंपूरे डॉ.देवेन्द्र मडावी, डॉ.प्रियंका सिडाम, डॉ.अफीफा शेख, डॉ. कोसे, डॉ.शेडमाके, डॉ.नाकाडे, औषधनिर्माता श्रीकांत आतला, मयूर कूमरे यांनी सेवा बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आदिवासी गोटूल समीतीचे अध्यक्ष मिलिंद उईके व त्यांचा चमूने सहकार्य केले.