अवघ्या चार महिन्यांतच पांढरसडा येथील जलकुंभाला गेले तडे

614

अवघ्या चार महिन्यांतच पांढरसडा येथील जलकुंभाला गेले तडे
– बांधकामावर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : जिल्हा परिषद गडचिरोली ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील पांढरसडा ग्रामपंचायत खुटगाव येथे‌ नव्यानेच नळ पाणीपुरवठा योजना वर्ष 2023 -24 जलकुंभ बांधकाम करण्यात आले पण याच बांधकामावर गावातील लोक प्रश्नचिन्ह विचारत असुन बांधकाम किती मजबुत असल्याचे दिसून येते. अवघ्या चार महिन्यांतच येथील जळकुंभाला तडे गेल्याने बांधकामाचा दर्जाही दिसून येत आहे.
गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात आली खरी. खाजगी कंत्राटदाराने 20,000 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी एप्रिल, मे महिन्यात बांधण्यात आली.
त्याच पाण्याच्या टाकीला अवघ्या चार महिन्यांत भेगा पडलेल्या दिसत आहेत. तसेच टाकीला लावलेल्या काळ्या पाईपांमधून पाणीसुद्धा बाहेर पडताना दिसत आहे. पाण्याची टाकी लिकेज असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. या जलकुंभाच काम चार महिन्यापूर्वी झाले होते त्या टाकीला भेगा पडलेल्या दिसून येत आहे यावरून त्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यात जलकुंभाला भेगा पडल्या कशा ? केलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

संबंधित इंजिनीर मेश्राम पाणी पुरवठा विभाग गडचिरोली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आढळला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here