निमगावात निरक्षरांचा साक्षरतेसाठी आटापिटा, वयोवृध्द असतानाही दिली परिक्षा

895

The गडविश्व
ता. प्र / धानोरा ,दि १८ : तालुक्यातील निमगाव येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित वयोवृध्द ६१निरक्षरांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन परिक्षा दिल्याने साक्षरतेसाठीचा आटापिटा आजी आजोबा करताना दिसले.
देशात ५ कोटीहून अधिक लोक निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षर कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी परीक्षा अंतर्गत निमगाव येथिल निरक्षरांनी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहून ७० ते ८० वर्ष वय झाले पण आम्ही कुठेही कमी नसल्याचा दाखला देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे साक्षरतेची परिक्षा दिली.
शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा असाक्षर व्यक्ती साठी शाळेमध्ये १० ते ०५.०० या वेळात पेपर आयोजित करण्यात आले होते. व्यवहारिक ज्ञान असल्याने पेपर सोडविण्यासाठी काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. निमगाव येथील निरक्षरांची उल्लास ॲपला ऐकून २०३ नोंद असुन त्यात स्त्री १५१ तर पुरुष ५२ आहेत. त्यापैकी स्त्री ४६ आणि १५ पुरुष अशा एकूण ६१ निरक्षरांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन परिक्षा दिली.
सदर परिक्षा यशस्वी करण्यासाठी शिक्षक देवेंद्र लांजेवार यांनी परिश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक काळबांधे, केंद्र संचालक म्हणून रमेश काळबांधे, पर्यवेक्षक म्हणून दिवाकर भोयर, उषा बोरकर, वर्षा नाकाडे, संतोष कोल्हे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here