The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : महाराष्ट्राल कर्जाला कंटाळुन आत्महत्या करण्याच्या घटना ताज्या असतांनाच आता राज्यातील पहिला असणाऱ्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना २६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटनेने खळबळ उडाली असुन कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. जगदीश अंबादास निकोडे (वय ४०) मु. बोदली ता.जि.गडचिरोली असे गळफास घेतलेल्या विवाहिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक जगदीश निकोडे हा विवाहित असुन तो आपल्या पत्नीसह लांझेडा येथे राहत होता. त्याने राधाकृष्ण महीला नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडचिरोली तसेच महाराष्ट्र बॅंकेतुन कर्ज घेतले होते. काही कारणास्तव त्याला कर्ज भरण्यास अडचण भासत होती मात्र वारंवार त्याला पतसंस्था व बॅंकेकडून कर्ज परतफेड करण्यास नोटीस बजावण्यात आली होती. वारंवार नोटीस येत असल्याने तो नेहमी चिंतेत राहत होता. दरम्यान शुक्रवार 26 जुलै रोजी पत्नी घरी नसतांना घरी त्याने राहत्या कर्जाला कंटाळुन घरी गळफास घेवून आत्महत्या केली. कर्जामुळे आत्महत्या करण्याची त्याच्यावर वेळ आल्याच्या या घटनेने जिल्हयात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम करून शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews #gadchirolilocalnews)