गुणवत्तेच्या नावाखाली शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची वेतनवाढ थांबणार

191

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १५ जुलै : अतिदुर्ग डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास जलद गतीने घडवून आणण्यासाठी सन १९७२ -७३ मधे शासनाने निवासी आश्रम शाळा सुरू केल्या. मुख्यत्वे अतिदुर्गम डोंगराळ व पाड्यातील आदिवासी मुलामुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून शैक्षणिक दृष्ट्या त्यांना सुशिक्षित करणे व त्यायोग्य त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. शिक्षणाचे ज्ञानगंगा दऱ्याखोऱ्यात दुर्गम भागात पोहोचवण्याचे काम शासकीय आश्रम शाळा मार्फत होत आहे. मात्र इयत्ता सातवी पर्यंत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्गा मध्ये प्रवेश घेताना त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते किंवा आठवीमध्ये प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे.

1. ज्या ठिकाणी इयत्ता सातवी पर्यंत शासकीय आश्रम शाळा आहे अशा शाळेतील विद्यार्थी सातवी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच नजीकच्या शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा ज्याप्रमाणे विद्यार्थी संख्या वाढेल त्या वाढीव विद्यार्थी संख्येस मान्यता देण्यात येत आहे.
2.  सातवी मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश मिळाल्यास तो विद्यार्थी शाळाबाह्य होणार नाही याची दक्षता इयत्ता सातवी पर्यंत असलेल्या आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनी घ्यावी
3.  शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व विषय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी हे पूर्ण व निवासी असूनही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे ज्या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा आणि संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांचा ० ते ५० टक्के निकाल लागला तर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित विषयाचे शिक्षक यांच्या दोन वेतन वाढी तर ५१ ते ८० टक्के निकाल लागल्यास एक वेतन वाढ अधिक कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रकरण परत्वे विशिष्ट कालावधी किंवा कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात
4. शासकीय आश्रम शाळेत शिकत असलेला विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी मध्ये अनुत्तीर्ण झाला असल्यास अशा विद्यार्थ्यास इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची फेरपरीक्षा होईपर्यंत किंवा पुढील वर्षाची परीक्षा पर्यंत आश्रम शाळेतच ठेवण्यात यावे
5. सदर विद्यार्थ्यांना पास झालेल्या विषयाशी संबंधित विषय शिक्षकाने मार्गदर्शन करावे व सदर विद्यार्थी उत्तीर्ण होईल अशी त्यांची खात्री करून घ्यावी.
6. आश्रम शाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांनी वरील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्यावा व याबाबत सनियंत्रण करावे.
7.  उपरोक्त प्रवेशित विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात
सदर कार्यवाही करून आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here