The गडविश्व
गडचिरोली, २९ जून : जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक गाव एक वाचनालय या संकल्पनेतुन पोलीस स्टेशन पुराडाचे वतीने पोलीस अधिक्षक निलोत्पल सा, अपर पोलीस अधिक्षक अभियान अनुज तारे सा, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा व उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर सा. कुरखेडा यांचे मार्गदर्शनात पुराडा येथे पोलीस स्टेशन पुराडा व ग्रामपंचायत कार्यालय पुराडा यांच्या संयुक्त विद्यामाने २७ जून २०२३ रोजी भव्य जनजागरण मेळावा व शहीद श्रावण उसेंडी सार्वजनिक अभ्यासीका व ३९ व्या वाचनालयाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक शहीद श्रावण उसेंडी यांची माता ग.भा. मुक्ताबाई तिरुजी उसेंडी व अध्यक्षस्थानी शहीद श्रावण उसेंडी यांची पत्नी श्रीमती रंजनाताई श्रावण उसेंडी व प्रमुख पाहुणे म्हणुन बालाजी दिघोडे सा. वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय पुराडा, डॉ. दिनेश नाकाडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पुराडा, सपोनि पवार सा. प्रभारी अधिकारी पोस्टे पुराडा पोलीस निरीक्षक, व्हि.ए. गोरड सा. (एसआरपिएफ) पुणे, पोउपनि प्रतापसिंह जाधव पोस्टे पुराडा पोउपनि आकमवाड सा. पोस्टे पुराडा पोउपनि जि.के.लांडगे (एसआरपिएफ) हिंगोली व पोस्टे परीसरातील पोलीस पाटिल हजर होते.
सदर जनजागरण मेळावा व शहीद श्रावण उसेंडी सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उद्घाटन व लोकार्पण सोडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि पवार सा. यानी केले व त्यानी आपल्या प्रास्ताविकात वाचनालयाने महत्व सांगुन पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या सर्व शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित जनसमुदायाला सर्व शासकिय योजनांचा व वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मंचावर उपस्थित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यानी आपआपल्या विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित शहीद श्रावण उसेंडी यांच्या माता व पत्नी याना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर वाचनालयात मुला- मुलीकरिता स्वतंत्र हाल बनविण्यात आले असुन स्वंतत्र प्रसाधनगृह बांधण्यात आले आहेत तसेच त्यात ३८ विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे एक कपाट ११० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. तसेच वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता व वाचनालयाची देखरेख करण्याकरिता पोलीस अंमलदार चिंतन कावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.