जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टिकेपली येथे सभामंडपाचे लोकार्पण

173

The गडविश्व
मूलचेरा, १९ फेब्रुवारी : तालुक्यातील लगामजवळील टिकेपली येथे पुरातन शिव मंदिरा समोरील सभामंडपाचे लोकार्पण जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
टिकेपली येथे पुरातन शिव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी जत्रा भरत असते. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र मंदिरासमोर सभामंडप नसल्याने भाविकांना गैरसोय होत होती. मात्र गेल्यावर्षी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर मंदिरापर्यंत डांबरीकरण रस्ता व मंदिरासमोर सभा मंडप उपलब्ध करून देऊ असा शब्द दिल होता. आता सदर काम पूर्ण झाले असून देवस्थान समितीकडुन आभार व्यक्त करण्यात आले तसेच शिवरात्रीचे औचित्य साधून आज शिवमंदिरात दर्शन घेवून सभामंडपाचे लोकांर्पण केले. यावेळी कार्यक्रमाला कु.साधनाताई मडावी सरपंचा, कु.सुनीता कुसनाके जि.प.सदस्य, शैलेंद्र पटवर्धन न.प.उपाध्यक्ष अहेरी, प्रशांत गोडसेलवर न.प.सदस्य अहेरी, सुरेश गंगाधरीवार सदस्य राजपूरप्याच, श्रीकांत समदार सरपंच शांतिग्राम, लिंगा टेकुलवार, कमल बाला आ.वि.सकार्यकर्ता, शंकर पानेमवार, राजुभाऊ दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव, प्रमोदभाऊ, शिवमंदिर टिकेपल्ली अध्यक्ष अजय नैताम, शिवमंदिर सचिव तुळशीराम मडावी, उपाध्यक्ष भीमराव कोरेत, कोशाध्यक्ष मारोती नैताम, सुरेखा नैताम उपसरपंच, गिरमाजी मडावी, बालीताई कोरेत सदस्य, व्यंकटेश काका त.मु. अध्यक्ष, बाबुराव सडमेक, ईश्वर सडमेक, विलास टेकुलवार, दिपाणकर समदार, दिनेश मडावी, सत्यवान कोरेत, बिचू तलांडे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवार, प्रकाश दुर्गेसह गावांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Ajay Kankadalwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here