मुरुमगाव आश्रम शाळेत बिटस्तरिय क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन

287

मुरुमगाव आश्रम शाळेत बिटस्तरिय क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन १८ सप्टेंबरला करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) प्रभू सादमवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मनेश मडावी हे होते. विशेष अतिथी म्हणून सरपंच शिवप्रसाद गवर्णा, माजी जि.प.सदस्य लताताई पुंघाटे, माजी प.स.सभापती अजमन रावटे, केंद्रप्रमुख अरुण सातपुते,पी. एस. आय सचिन ठेंग, मुख्याध्यापिका कु .डी . वाय . मेश्राम,
रेवणाथ चलाख, तंटा मुक्त अध्यक्ष शिवनाथ टेकाम, माजी पोलिस पाटील
वसंतजी कोलियारा, उपसरपंच मथनुराम मलिया, महिला तंटा मुक्ती अध्यक्ष शैलाताई कावडकर, आरोग्य सेवक शुभम उईके, जपतलाई आश्रम शाळा मुख्याध्यापक ताटपल्लिवार, अधीक्षक सचिन भालेकर, कु किरण कांबळे, बीट निरीक्षक गावड, बखर, क्रीडा व्यवस्थापक बि.ए. जयभाये, शाळा व्वस्थापनान समिती उपाध्यक्ष पूनिताताई दरो, सदस्य रजकुवर दुग्गा, फगणीबाई नैताम, परमेश्वर राऊत, रंजित आत्राम, शेरशिंग हलामी आदी उपस्थित होते. याप्रसंगी पंच व खेळाडूंना शपथ देण्यात आली.
उदघाटनीय सामना मुरुमगाव विरुद्ध रांगी संघा दरम्यान खेळण्यात आला. त्यात मुरुमगाव संघ विजय ठरला. क्रीडा स्पर्धेत बिटातील १० आश्रम शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले. सदर स्पर्धा १८ ते २० सप्टेंबर पर्यंत आयोजित केली असून यात विद्यार्थांच्या शारीरिक व सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटक प्रभू सादमवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कु. डी. वाय. मेश्राम यांनी केले, संचालन जी. डी.हर्षे यांनी केले, आभार एस. एम. पेदापल्ली मॅडम यांनी मानले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here