जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन

150

– जय पेरसापेन प्रसन्न ७५० पि. आर.सि. कोलपल्ली च्या वतीन व्हॉलीबाल स्पर्धा
The गडविश्व
अहेरी, २४ फेब्रुवारी : तालुक्यातील कोलपल्ली येथील जय पेरसापेन प्रसन्न ७५० पि. आर.सि.च्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन संपन्न झाले.
यावेळी खेळाडूना जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत ते सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा सम्मेलन घेणे गरजेचे आहे. मात्र यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही पण युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात पुरस्कार देत असतो, खेळ खेळत असताना हार-जीत होत असते मात्र आपण हरलो म्हणून खचून जाऊ नये विजय एक दिवस आपलासुद्धा होऊ शकतो. तसेच पुढे बोलताना म्हणाले ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आमचा एकच उद्देश्य आहे तो युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगला खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाचा व तालुक्याचा नावलौकीक होत असतो. हे होत असताना गावातीला सामाजिक, शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.
यावेळी मंचावर माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी जि.प. सदस्या सुनीता कुसनाके, महेश लेकूर सदस्य ग्रा.प.देवलमरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेक, व्येकटेश चालूरकर, दिवाकर गावळे, शंकर चालूरकर, व्येकटेश गावळे, संपत आईलवार, दीपाताई मडावी, गंगुबाई सोयाम, बिचु वेलादी आदी गावातील नागरीक उपस्थित होते.
सामान्यांच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज सोयाम, उपाध्यक्ष राजकुमार चालूरकर, सचिव विशाल सोयाम, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम आईलवार, सहसचिव मिथुन येरमे व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here