The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील रांगी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन सरपंचा फालेश्वरी प्रदिप गेडाम यांच्या हस्ते आज ३ जानेवारी २०२५ रोजी पार पडले.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने नविन ईमारत बांधकाम करण्यात आले. जुनि इमारत जीर्ण झाली असल्याने अंगणवाडी क्रमांक १ नव्याने बांधकाम करण्यात आले. या अंगणवाडी ईमारतीचे उद्घाटन रांगी ग्रामपंचायतच्या वतिने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले. डिजिटल स्वरूपात बांधलेल्या ईमारतीला रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले आहे. रिबिनफित कापुन सरपंचा फालेश्वरी गेडाम यांनी विधिवत उद्घाटन केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अंगणवाडी क्रमांक १ मधे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच नुरज हलामी, तंमुस अध्यक्ष तुळशीराम भूरसे, रामचंद्र कांटेगे पो.पाटिल रांगी, अर्चना मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, दिवाकर भोयर शिक्षक, देवराव कुनघाडकर, एम.बी.बांबोळे, चीनु गन्नेनवार, वरवाडे अंगणवाडी सेविका, नामदेव बैस, रोशन कन्नाके, दिपक कुकडकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितिन कावळे यांनी तर आभार बांबोळे यांनी मानले.