The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ७ : ग्यारापती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सिविक एक्शन प्रोग्राम अर्तगत ए/११३ बटालियनच्या वतीने १२ महिलांकरिता शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
सीआरपीएफ ग्यारापतीच्या वतीने ग्रामीण भागातील महिला व भुपतीयांचा आर्थिक जिवन स्तर सुधारुण चांगल्या पद्धतीचे जिवन जगता यावे, महिलांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी बटालियनचे कमांडेट की जसवीर सिंह च्या मार्गदर्शनाखाली कोरची तालुक्यातील ग्यारापती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुख्य गावातील एकुण १२ महिलांना शिवनकला प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
शिलाई मशीन प्रशिक्षण (शिवणकला) नवयुवक आदिवासी बहुउदेशीय मंडळ घोलडोंगरी ने दिले. शिवणकला शिकविण्यासाठी प्रशिक्षण केद्र ३० दिवस चालवून प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ट्रेनिंग ऑफ क्रि रिक्रुटमेन्टसाठी २० मुला-मुलींना अर्धसैनिक बल व पुलिस बल मध्ये भरती होण्यासाठी नवयुवक आदिवासी बहुउदेशीय मंडळ घोलडोंगरी प्रशिक्षण केंद्रद्वारे ग्यारापती पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाचे उदघाटन बटालियन चेकमाण्डेन जसवीर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभ प्रसंगी सयद कईम अबाल (सहायक कमाण्डेन्ट), नरेश वाडीवले पोलीस उप निरीक्षक पोलीस स्टेशन ग्यारापती, बुधाराम आमले ग्रामसंभा अध्यक्ष ग्यारापती व गावकरी उपस्थित होते.