– केंद्रियमंत्री पियूष गोयल यांच्याकडे दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी
The गडविश्व
ता.प्र./ आरमोरी (नरेश ढोरे), ४ फेब्रुवारी : शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत रब्बी उत्पादन हंगाम २०२२-२३ चे धान (तांदूळ) खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी करून चर्चा केली
गडचिरोली- चिमूर हा पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्र आहे. ज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. रब्बी धानाचे पीक गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि काही पुराव्यांनुसार गडचिरोली जिल्ह्यात घेतले जाते. धान उत्पादनाच्या प्रमाणात धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यंत कमी असल्याने यांचा शेतकऱ्यांना अनेकदा खरेदी केंद्रावर सामना करावा लागतांना दिसतो. यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेता शेतकरी बांधवांचे धान उत्पादन खरेदीचे उद्दिष्ट १२ क्विंटल प्रति एकर म्हणजे ३० क्विंटल प्रति हेक्टर इतके उद्दिष्टे वाढवावे याकरिता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी सामाजिक नेते नानाभाऊ नाकाडे, जेसा मोटवानी उपस्थित होते.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Vani Jayaram) (Everton vs Arsenal) (Man United vs Crystal Palace) (Wolves vs Liverpool) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea)