दुर्गम भागातूनही शिबिराला वाढता प्रतिसाद

102

– ३९ रुग्णांना नको व्यसनापासून होणारा त्रास
The गडविश्व
गडचिरोली, १२ जानेवारी : मुक्तीपथ अभियानाच्या व्यसन उपचार शिबिराला दुर्गम भागातूनही वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. नुकतेच अतिदुर्गम भागातील अडंगे व हिरंगे येथे आयोजीत शिबिराच्या माध्यमातून एकूण ३९ रुग्णांनी उपचार घेत व्यसनामुळे होणारा त्रास दूर करण्याचा निर्धार केला आहे.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अडंगे येथे आयोजित गाव पातळी व्यसन उपचार शिबीरातून २२ रुग्णांनी उपचार घेतला आहे. रुग्णाची नोंदणी तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केली. रुग्णाची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येलुरकर संयोजक व स्पार्क कार्यकर्ती रुणाली कुमोटी यांनी घेतली. समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. गाव पातळी क्लिनिक यशस्वी करण्याकरिता मुक्तीपथ गाव संघटन सदस्य गाव पाटील दोहे हेडो, भूमया मादी हेडो, आशा वर्कर नेंडो हेडो, अंगणवाडी सेविका वनिता मडावी, मुख्यध्यापक एल.बी.गुंडरू, यशवंत कोवासी यांनी सहकार्य केले.
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हिरंगे या छोट्या गावात शिबिराचे आयोजन केले असता एकूण १७ रुग्णांनी परिपूर्ण उपचार घेतला. माणकसाय नैताम यांनी शिबिरास सहकार्य केले. समुपदेशन प्राजक्ता मेश्राम ,केस हिस्ट्री छत्रपती घवघवे यांनी घेतली. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक भास्कर कड्यामी, राहुल महाकुलकर यांनी केले. अशाप्रकारे दुर्गम भागात वसलेल्या गावातील एकूण ३९ रुग्णांनी मुक्तीपथ गाव पातळी शिबिराचा लाभ घेतला आहे. व्यसन उपचार गावातच उपलब्ध होत असल्याने गोरगरिबांना उपचार घेणे सोयीस्कर ठरत आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here