मुरूमगाव येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा

146

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, 16 ऑगस्ट : तालुक्यातील मुरूमगाव येथे विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आले. यामध्ये पोलीस मदत केंद्र मुरूमगाव या ठिकाणी एपीआय मिथुन शिरसाट यांनी ध्वजारोहण केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच रामचंद्रजी दखणे विद्यालय, शासकीय आश्रम शाळा , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पीएसआय सचिन ठेंग, पीएसआय सुरज जलवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बनसोड, सरपंच शिवप्रसाद गवर्णा, माजी जिल्हा परिषद सदस्य लताताई पुंघाटे , माजी सभापती अजमन रावटे, अर्चना देशमुख बँक सखी, मारोतराव पुंघाठे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत मध्ये सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी ध्वजारोहण केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर कुंबरे यांनी ध्वजारोहण केले. यात शाळेतील शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी मान्यवर उपस्थित होते. या दिवशी गावातील तरुणांनी शालेय विद्यार्थ्यांकरीता अल्पोहाराचे कार्यक्रम आयोजित केले त्यासाठी गावकरी लोकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी तरुणांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here