दारूमुक्त होण्यासाठी ग्रामीण भागातून पुढाकार

108

-विविध गावातील ९५ रुग्णांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : आपल्या गावातील रुग्णांची व्यसन उपचाराची गरज लक्षात घेता, गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे विविध गावांमध्ये एक दिवशीय व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ९५ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तज्ञ समुपदेश व संयोजक यांच्या माध्यमातून रुग्णांना योग्य सल्ला व औषोधोपचार देखील करण्यात आला.
गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी, मेंढा येथे येथे आयोजित शिबिरात ३५ पेशंटनी उपचार घेतला. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम, प्रेरक मेघा गोवर्धन, स्पार्क कार्यकर्ता बुधाबाई पोरटे, m.s.w चे विद्यार्थी मयूर बारसगडे, जयश्री मलगाम यांनी केले. गावातील वामन टीकले ग्राप.सदस्य खरपुंडी , तसेच संजय मडावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेंढा यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली (कतलामी टोला) येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आला. त्यामध्ये १३ पेशंटने पूर्ण उपचार घेतला. धानोरा तालुक्यातील आस्वलपार येथील शिबिरातून १५ जणांनी उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबीरामध्ये २० पेशंटनी पूर्णवेळ उपचार घेतला. शिबिराचे नियोजन आनंद सिडाम यांनी केले. या विविध गावांतील शिबिरामध्ये समुपदेशक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची तपासणी करीत धोक्याची घटक व औषोपचार या विषयवार मार्गदर्शन केले तर संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी पेशंटची केस हिष्टी घेतली. ग्रुप शेषनच्या माध्यमातून दारू सोडण्यासाठी उपाय सुचवले. एटापल्ली तालुक्यातिल अतिदुर्गम गाव गडेरी येथील शिबिरात १२ रुग्णांनी उपचार घेतला. गाव पातळी व्यसन उपचार शिबिरात रुग्णांची केस हिस्ट्री दशरथ रमकाम तसेच रुग्णाचे समूपदेशन व ग्रुप शेषणमध्ये व्यसनाचे गांभीर्य समजावत धोक्याचे घटक समुपदेशक पूजा येलूरकर यांनी सांगितले. शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापन किशोर मलेवार तालुका संघटक यानी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटन सदस्य डोलुजी इस्टाम गाव पाटिल, वंदना इस्ताम आशा वर्कर, राकेश इस्टाम, सुनीता मडावी अंगणवाडी सेविका, गीता कुंभरे यांनी सहकार्य केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #serchhospital #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here