– तीन दिवसीय कार्यक्रमात हजारो भाविक भक्त सहभागी
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी ( नरेश ढोरे), २० फेब्रुवारी : तालुक्यातील डोंगरतमाशी येथे राधाकृष्ण मुर्तीची स्थापना व मुर्तीं, मंदिर लोकार्पण सोहळा हजारो भाविक भक्तांच्या आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
यात पहिल्या दिवशी घट स्थापना दिप प्रज्वलन, महिला बचत गट डोंगरतमाशी यांचा मेळावा व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, राधाकृष्ण मूर्तीचे मंदिरात प्रवेश, महाप्रसाद, सुकाळा व डोंगरतमाशी येथील बाल भजन मंडळाचे भजन कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी सकाळी हभप श्रीहरी महाराज गुरनुले यांचे करकमलाव्दारे विधी युक्त होम हवन, सायंकाळी श्नी हभप शंकर महाराज ठाकरे व श्री हभप रंगराव सेगर महाराज यवतमाळ यांचे शुभ हस्ते विधी युक्त गोवर्धन पूजा, हभप दुमाने महाराज कोजबी यांचें मधूर वाणीतून नामस्मरण व हरीपाठ, महाप्रसाद, संपूर्ण राञभर कुरंडीचक, वडेगांव, मेंढा, कुरुंडीमाल, मोहझरी या मंडळांचे भजन, तिसऱ्या दिवशी सकाळी श्री हभप जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य रा.हडस्ती ता.जि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली ध्यान पाठ, दुपारी हभप उदाराम बावणे महाराज वडेगांव यांचें संचासह गोपाल काला, हभप संत मंडळी तसेच पाहूणे मंडळाचे व महोदयांचे स्वागत व उपस्थितांच्या साक्षीने जनता जनार्दनास राधाकृष्ण मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला व यानंतर महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मनोहर तितिरमारे, गणेश वनवे, अतुल मने, सुरेश मने, संजय हलमारे,दिनेश देशांशी, सोनू सानुदिया, विजय लाकडे,क्रिष्णा पेंदोरकर, तौफिक भाई सयानी, भाईचंद गुरनुले, वामनराव नाकाडे, पुंडलिक मोहूर्ले, आनंद तागडे, राहूल धाञक, भाऊराव भोयर, तथा मानापूर, देलनवाडी, पिसेवडधा, सिर्सि, पळसगाव, वडेगांव, मेंढा, कुरुंडीमाल, मोहझरी, कुरुंडीचक, वैरागड, सुकाळा, शिवनीखुर्द, आरमोरी आणि डोंगरतमाशी येथील सर्व महिला पुरुष मुले मुली यांनी अथक परिश्रम घेतले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)