२६ जून ला आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा होणार

157

The गडविश्व
गडचिरोली, २३ जून : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावात दरवर्षी २६ जून हा दिवस “ड्रग अॅब्यूज आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस” म्हणून घोषित केला होता आणि दरवर्षी २६ जून रोजी “आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा केला जातो. भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्या विरूद्ध लढण्यासाठी “ड्रग मुक्त भारत” साठी एक संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन रण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने दिनांक १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा ” ची अंमलबजावणी सुरू आहे. ड्रग्सच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन (२६ जून) हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. सदर दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहिमेचे निर्देशही माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहेत. यास्तव, एनसीबीने सूचित केल्यानुसार, या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन ड्रग्जचा पुरवठा/मागणी/हानी संबंधित घट रण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात येत आहे. “नशा मुक्त भारत” चे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकू शकू. यासाठी नशा मुक्त भारत पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here