– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती
The गडविश्व
अहेरी, ९ मार्च : पेरमीली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट, महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला उमेद गटाचे १७० महिला बचत गटांची उपस्थिती होती. यावेळी महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांवरील अन्याय अत्याचार,याबाबत तसेच महिलांच्या विविध अडचणी, काम करत असताना होणाऱ्या समस्या बाबत याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंचावर पेरमीलीच्या सरपंचा सौ.किरणताई नैताम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संच प्रमुख तसेच १७० महिला बचत गटांचे पदाधीकारी व महिला सदस्य उपस्थिती होते.
(The Gadvishva) (The Gdv) (Gadchiroli news updates) (Ajay Kankadalwar)