-अवैध व्यवसायावर आशीर्वाद कुणाचा ?
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १९ मे : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने अवैध दारूविक्री केल्या जात असल्याचे चित्र आहे. कुरखेडा (kurkheda) शहरातील हॉटेलआड खुलेआम दारूची विक्री केल्या जात असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दारूविक्रीवर आशीर्वाद कुणाचा ? असा देखील सवाल केल्या जात आहे.
गडचिरोली (gadchiroli) जिल्हानिर्मिती पासूनच जिल्ह्यात दारूबंदी आहे, असे असतांनाही छुप्या मार्गाने दारू विक्री केल्या जात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी निलोत्पल रुजू झाले तेव्हापासून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीविरोधात तसेच अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. असे असतांनाही मात्र कुरखेडा शहरात मुख्य मार्गावर हॉटेलआड खुलेआम अवैधरित्या दारू विक्री केल्या जात आहे. हॉटेल मध्ये जाऊन दारूची मागणी केल्यास मद्यपीला दुप्पट किंमतीत बिनधास्तपणे दारू मिळते. त्यामुळे त्या अवैध दारूविक्री करणाऱ्याला कोणाचीच भीती नाही हे स्पष्ट दिसून येते. जिल्हयात मुक्तीपथ द्वारे अवैध दारू व खर्रा विक्री विरोधात कारवाई करण्यात येते. ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो तिथे दारू व खर्रा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते मात्र शहरात हॉटेलआड खुलेआम दारू विक्री होत असल्याचे मुक्तीपथ तसेच पोलीस प्रशासनाला निदर्शनास येत नसेल काय ? हा संशोधनाचा विषय असून त्या दारूविक्रेत्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही काय ? त्यावर आशीर्वाद कुणाचा ? पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवैध व्यवसायावर होणाऱ्या कारवाईला ब्रेक तर लागला नाही ना ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन व मुक्तीपथ यंत्रणा सक्रिय होऊन कारवाई करतील का याकडे लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvishva, kutkheda, gadchiroli, police, sp nilotpal)