दारूबंदीच्या गावात १ बॉटल दारू आणणे पडले महागात

1271

– मद्यपीवर दंडात्मक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : मुलचेरा तालुक्यातील व अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शांतिग्राम येथे मुक्तिपथ गाव समितीच्या महिलांनी अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन अहिंसक कृतीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे सध्यस्थितीत गावातून अवैध दारू हद्दपार झाली आहे. या गावात दारू घेऊन प्रवेश करणे एका मद्यपीला चांगलेच महागात पडले आहे. गाव संघटनेच्या महिलांनी संबंधित व्यक्तीकडून दारू जप्त करून दंड सुद्धा वसूल करण्यात येणार आहे.
शांतिग्राम येथील महिलांनी मागील ५ महिन्यांपासून अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. गावातील अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन विविध ठराव पारित करण्यात आले आहेत. सोबतच दारू पिऊन किंवा गावात दारू आणणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून गावामध्ये अवैध दारूविक्री बंद आहे. अशातच एक दारू पिणारा व्यक्ती एक बॉटल दारू तीन दिवस रोज पिण्याकरिता चोरून-लपून आणत होता. याबाबतची माहिती मिळताच मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी संबंधित व्यक्तीला दारूसहीत पकडले. त्यानंतर मुक्तिपथ, गाव समितीने सभा घेऊन निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठरवलेल्या नियमानुसार दंड वसूल करण्याचे ठरले. त्यानुसार दारू पिणाऱ्याकडून १ हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच पुन्हा अवैध दारू गावात न आणण्याचे ठणकावून सांगण्यात आले.
यावेळी सरपंच अर्चना बैरागी, मुक्तिपथ संघटना अध्यक्ष संगीता शील, संदिपा घरामी, वसंती हलदार, सुगंधा विश्वास, बकुल मिस्त्री, तापती मंडल, जयंती देवनाथ, सिखा बैरागी, उषा देवनाथ, कमली शाल, पुष्पा हलदार, शेफाली देवनाथ, कल्पना दास, तिलोका गाईन, सुचित्रा विश्वास, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ती समीक्षा कुळमेथे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath #Bangladesh vs Australia #Spain vs Italy #Virat Kohli #Jasprit Bumrah #Rishabh Pant #Donald Sutherland )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here