The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : तालुक्यातील रांगी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था र.न.७१० ची अध्यक्ष पदाची निवडणूक ८ एप्रिल २०२५ ला पार पडली. या निवडणुकीत शशिकांत साळवे यांच्या गटाचे जगदीश कन्नाके यांची अध्यक्षपदी तर केशव मेश्राम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने भाजपच्या गटात आनंदा उत्सव साजरा करण्यात आला.
२०२४-२५ ते २०२९-३० पाच वर्षा करिता ही निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीमध्ये आदिवासी विविध सेवा सहकारी सोसायटी वर साळवे गटाचे १३ उमेदवार निवडून आले होते. त्यात महिला प्रतिनिधी गटातुन माधुरी लुकेश जांगी, प्रेमिला रामाजी काटेंगे, इतर मागास प्रवर्ग गटातून विलास दादाजी भोयर, सर्वसाधारण बिगर आदिवासी खातेदार गटातून डोमाजी केशव मेश्राम, दिलदार खाँ कासम खाँ पठाण, सर्वसाधारण आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात, विनायक काशिनाथ किरंगे, रवींद्र मनोहर हलामी, निलेश सदाराम जांगी, जगदीश महादेव कन्नाके, रूपचंद श्रीराम गेडाम, लालाजी बावजी पदा, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष प्रवर्गात शशिकांत विठ्ठलराव साळवे,अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी, घनश्याम ढिवरू खेवले निवडून आले होते.
८ एप्रिल २०२५ ला संचालक मंडळाची सभा आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या आवारात एन.टि.चव्हान प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. अध्यक्ष पदा करिता जगदीश कन्नाके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.अर्जावर विनायक किंरगे सुचक, रविंद्र हलामी यांनी अनुमोदन केले. तर उपाध्यक्ष पदाकरीता केशव मेश्राम यांना सुचक दिलदार खाँ पठाण यांनी तर विलास भोयर यांनी अनुमोदन दिले.
बिनविरोध झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे सरपंच सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, श्रावण देशपांडे, नंदू कुनघाटकर, नरेंद्र भुरसे, दिवाकर भोयर यांनी अभिनंदन केले आहे.
