मित्रपरिवार व युवा कार्यकर्त्यांकडून जितुभाऊ ठाकरे यांचा जन्मदिवस जनहितार्थ कार्य करून साजरा

210

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे) २३ डिसेंबर : ओ. बी. सी. च्या हक्कासाठी अहोरात्र झटणारे, गावाच्या विकासाची काळजी घेणारे उगवते नेतृत्व असलेले जितुभाऊ ठाकरे यांचा जन्मदिवस मित्रपरिवार व युवा कार्यकर्त्यांकडून जनहितार्थ कार्य करून साजरा करण्यात आला.
कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसतांना प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात आणि आमदार कृष्णा भाऊ गजबे यांच्या नेतृत्वात अल्पावधीतच जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून स्वकर्तुत्वाने समाजात स्वतःचा वेगळा अस्तित्व जितु भाऊ ठाकरे यांनी निर्माण केला आहे. आपण समाजात वावरत असताना आपल्याला समाजाचे ऋण फेडावे लागतात या विचाराचे जितु भाऊ आहेत.
जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली आहे, थंडीमुळे संपूर्ण वातावरण गारठलेला आहे. विविध अनाथ, काही मतिमंद लोक अश्या वातावरणात देखील बाहेर कुठेतरी बस स्टॉप वर, कोणत्या झाडाखाली आश्रय घेऊन आपली रात्र व्यतीत करत असतात. अश्यातच युवामंच चे सक्रिय सदस्य ओ. बी. सी. चे युवा नेतृत्व जितेन्द्र भाऊ ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या मित्रपरिवार आणि युवामंच सदस्य यांच्या वतीने आरमोरी शहरातील विविध ठिकाणी जाऊन अश्या गरजु लोकांना कडाक्याच्या थंडीतुन बाचावाकरिता ब्लँकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी युवामंच चे पंकज भाऊ उपस्थित होते.

(The Gadvishva) ( Gadchiroli News updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here