– जोगीसाखरा येथे पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवाड यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी ( नरेश ढोरे), ८ डिसेंबर : दिवसेंदिवस निसर्गात होणारा नैसर्गिक बदल, पाणीटंचाई आणि दुसरीकडे शेती व्यवसाय व मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या पाण्याच्या मोठ्या वापरामुळे भूगर्भ कोरडा पडत आहे त्यामुळे घरावर व अंगणात पडलेले एक एक थेंब पाणी वाया न घालवता जमिनीत मुरवून जलक्रांती घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांनी केले.
ते आरमोरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत जोगीसाखरा अंतर्गत जोगीसाखरा येथे ८२ लक्ष व सलमारा येथे २६ लक्ष रुपये किमतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा सरपंच संघटनेची तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, आरमोरी शहर अध्यक्ष अमिन लालानी, आरमोरी शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, तालुका सरचिटणीस धुरंदर सातपुते, गुरुदेव जंगल कामगार संघाचे अध्यक्ष दिलीप घोडाम, माजी सरपंच नामदेव कुंमरे, ग्रामपंचायत सदस्य देविदास ठाकरे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष देवानंद बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ज्योती घुटके, महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सोनकुसरे, ज्योती घाटूरकर, ग्रामपंचायत सदस्य करिष्मा मानकर, प्रतिभा मोहुरले, अश्विनी घोडाम, वैशाली चापले, स्वप्निल गरफडे, निलेश कलंगा, देवराव राऊत, यादवराव कहालकर, सुनील कुमरे, शेषराव कुमरे, आदी प्रमुख मान्यवरांसहित जोगीसाखरा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोगीसाखरा गटग्रामपंचायत कर्मचारी गुणवंत ठाकरे, मधुकर मानकर यांनी विशेष सहकार्य केले.
(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Narhari zirwal)