The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० सप्टेंबर : तालुक्यातील मुरुमगाव येथे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मानिमित्त २८ सप्टेंबर २०२३ रोजी येथील मुस्लिम बांधवांनी मोठी धूप धाम व भव्य मिरवणूक व निदर्शने केली. संपुर्ण मुरुमगाव पैगंबर महंमद यांच्या जयघोषात नाट व सलाम पठण करण्यात आले. ही मिरवणूक विना ढोल-ताशे, डीजे विना, स्वच्छ व शांततेत काढण्यात आली. या मिरवणुकीची अर्ध्या तासात सांगता झाली.
सुन्नी जामा मस्जिद मुरुमगाव येथे फातिहा पठण करण्यात आले व मुरुमगावातील मुस्लिम व इतर समाजातील लोकांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या जन्माच्या आनंदात संपूर्ण मुरुमगाववासीयांमध्ये शरबत व मिठाई वाटण्यात आले व त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद शरीफ भाई कुरेशी, मोहम्मद आरिफ भाई कुरेशी, मोहम्मद शाहीर कुरेशी, मोहम्मद मुनीर शेख, मोहम्मद शाकीर शेख, मोहम्मद साहिद शेख, मोहम्मद रहिद शेख, मोहम्मद अस्लम शेख, मोहम्मद फिरोज भाई कुरेशी, मोहम्मद महमूद पठाण, बाबर कुरेशी यांनी केले. फिरोज पठाण, गोरेखा पठाण, कयामुद्दीन शेख, मोहम्मद नईम शेख, या सर्व मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.