कोरची : विविध दारुच्या गुन्ह्यातील जप्त सहा लाख ८० हजारांचा मुद्देमाल केला नष्ट

190

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे कोरची हद्यीतील अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे कोरची येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये 49 गुन्ह्यातील एकुण सहा लाख ८० हजार ४५० रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ५ डिसेंबर रोजी रोजी नष्ट करण्यात आला.
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने ५ डिसेंबर रोजी पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे कोरची हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात देशी दारुच्या 180 मिली मापाच्या 449 बाटल्या, देशी दारुच्या 90 मिली मापाच्या 4047 बाटल्या, विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या 2609 बाटल्या, 650 मिली मापाच्या बियरच्या 202 बाटल्या, 500 मिलीच्या बियरच्या 130 टिनाचे कॅन, 330 मिली मापाच्या बियरच्या 61 बाटल्या याप्रमाणे एकुण 7498 बाटल्याचा मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने 10 x 10 चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्याच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची येथील प्रभारी अधिकारी अमोल फडतरे, मपोउपनि. आसावरी शेडगे, परी. पोउपनि योगेश पवार व सर्व अंमलदार यांचे उपस्थीतीत पार पडली.

(the gadvishva, gadchiroli, korchi, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here