The गडविश्व
गडचिरोली, १३ सप्टेंबर : जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली तर्फे १२ सप्टेंबर ला जिल्हा परिषद उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव ता. कोरची येथील बालकांना बाल संरक्षण विषय कायद्यांची माहिती दिली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ता तनोज ढवगाये यांनी बालकांचे अधिकार, ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व बालकांचे विविध कायदे , पोस्को ऍक्ट, जे जे ऍक्ट बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बाल कामगार अधिनियम, चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक 1098 याबाबत बालकांना मार्गदर्शक केले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अनव्ये मुलीची वय 18 व मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही अशी शपथ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 8 ते 12 वी मधील शिक्षण घेणाऱ्या एकूण 114 बालकांना दिली.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यावेळी उपस्थित मुख्याध्यापिका श्रीमती ऐ. एस. सोनकुसरे, मसराम, सोलंके, उसेंडी, विद्या उमरकर, उपस्थित होते.