कोरची : लोडशेडिंगने नागरिक त्रस्त, रब्बी हंगाम धोक्यात

134

– केवळ अर्धा ते दोन तासचं वीज पूरवठा होत असल्याचा नारिकांचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि.११ : तालुक्यातील नागरिक लोडशेडिंगने त्रस्त झाले असुन दिवसातील २४ तासापैकी केवळ ८ तास लाईट पुरवठा करण्यात येते मात्र त्यातीलही केवळ अर्धा ते दोन तासचं वीज पूरवठा होत असल्याचा आरोप तालुक्यातील कोठरा फेडर वरून विद्युत पुरवठा करण्यात येणाऱ्या गावातील नागरिक करतांना दिसत आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून कोरची तालुका शेवटच्या टोकावर आहे. तालुक्यात काही दिवसांपासून लोडशेडिंग सुरू असुन दिवसाच्या २४ तासापैंकी फक्त ८ तास विज पूरवठा होत असतांना त्यातीलही केवळ अर्धा ते दोन तास वीज राहत असल्याचे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील कोठरा फेडर वरून् पुरविण्यात येणाऱ्या गावांना आधी १ ते २ तास लोडशेडिंग असायची मात्र आता १० ते १५ तास लाईट राहत नाही. उर्वरीत वेळेतही केवळ अर्धा ते २ तास वीज राहत असल्याने या फेडर अंतर्गत येत असलेल्या गावतील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोठरा फेडर अंतर्गत जवळपास २० गावांना वीज पूरवठा केल्या जात असल्याचे समजते. लोडशेडिंगमुळे शेतपिकांना वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात आले आहे. दिवसातुन केवळ अर्धा ते दोनचं तास लाईट राहत असल्यान पिके पिकवायची कशी असा देखील सवाल परिसरातील नागरीक करतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here