कोरची : संगनमताने कट रचुन केला खुन, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

975

– ४ दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, १४ फेब्रुवारी : चार जणांनी संगनमत करुन कट रचुन मेहतर कुवरसिंग कचलाम (५५) वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवुन नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केल्याप्रकरणी कोरची पोलिसांनी अधिक जलद गतीने तपास करून सदर प्रकरणाचा छडा लावत एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मुकेश बुधरुराम यादव(३६), व्यवसाय – फॉरेस्ट गार्ड, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला-चौकी (छत्तीसगड), सौरभ राजेंद्र नागवंशी (२७), व्यवसाय चालक, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), रुपसिंग बाबुराव तुलावी (२७) वर्षे व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला – चौकी – (छत्तीसगड), आसुराम देवजी तुलावी (३६) वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. – मानपूर – मोहला – चौकी (छत्तीसगड) असे अटकेतील आरोपींचे नाव असून आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरची पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवसुन कटेझरी जाणाऱ्या रोडवर सुमारे ५५ किलोमीटर पूर्व दिशेला एक अनोळखी मृतदेह ८ जानेवारी २०२३ रोजी मिळुन आला होता. या प्रकरणाचा पोलीस स्टेशन कोरची येथे मार्ग दाखल करून तपासात घेतला असता मृतकाची ओळख पटली. मेहतर कुवरसिंग कचलाम (५५) वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. परंतु या मर्गबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांना शंका असल्याने त्यांनी मर्गबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांना दिले. यावरुन एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर सखोल चौकशीअंती हा मर्ग नसुन, खून असल्याचे उघडकीस आल्याने संशयीत आरोपींनी संगनमत करुन कट रचुन मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवुन नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणुन टाकल्याचे सांगीतले. त्यावरुन गडचिरोली पोलीस दलाने आरोपीतांवर पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. १३/२०२३, कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१, ३४ भादवी अन्वये केला असुन, त्यांना अटक करण्यात आली व सदर अटकेतील आरोपीतांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा, साहील झरकर हे करीत आहेत.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (Kurkheda) (Korchi) (SP Nilotpal) (Gadchiroli Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here