– अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री केली जाते. कोरची तालुक्यात अवैधरित्या दारूची तस्करी करताना पोलिसांनी वाहनासह १६ लाख १ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई धडक कारवाई १२ एप्रिल रोजी केली. याप्रकरणी वाहन चालक धम्मत गुणवंत बोरकर (२४) रा. गिधाडी ता. गोरेगाव जि. गोंदिया तसेच फरार अज्ञात विरुद्ध कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. धम्मत गुणवंत बोरकर ला न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत पोलिस स्टेशन ला आदेश दिले आहे. १२ एप्रिल रोजी पांढया रंगाच्या बोलेरो पिकअप या चारचाकी वाहनाने देवरी ते कोरची रोडने अवैधरित्या दारुची वाहतुक करणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे कोरची पोनि. शैंलेद्र ठाकरे व त्यांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पकनाभट्टी जांभळी जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला सापळा रचुन बसले असता, सकाळी ०६:४० वाजताच्या दरम्यान एक पांढया रंगाची बोलेरो चारचाकी वाहन संशयास्पदरित्या येतांना दिसली. पोलीसांनी वाहन चालकास हात दाखवून थांबवण्याचा ईशारा केला. त्यावेळी वाहन चालकाने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील ट्रॉलीत असलेल्या मूरमुऱ्याच्या बोऱ्याखाली दारू लपवून ठेवलेली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चारचाकी वाहनासह १६ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. प्रविण बुध्दे, पोस्टे कोरची हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी कोरची पोनि. शैंलेद्र ठाकरे, पोउपनि. योगेश पवार, पोउपनि. प्रविण बुध्दे, पोहवा/राकेश मेश्राम, पोअं/दिनेश कुवर, इंसाराम ताराम यांनी पार पाडली.
