कोरची : बेळगाव येथील हर्षा उईके ने डॉक्टर बनण्याचे स्वप्न केले पूर्ण

2885

– तालुक्यातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टरेट पदवी मिळविण्याचा मान
The गडविश्व
कुरखेडा / कोरची, ९ जून : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका का आदिवासी बहुल अतिदुर्गम व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. याच तालुक्यातील बेळगाव येथील हर्षा भुणेश्वरसिंग उईके हिने तालुक्यातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान पटकाविला आहे. नुकतीच ७ जून २०२३ रोजी डॉक्टरेट पदवी तिला प्राप्त झाली आहे. हर्षा उईके ही आदिवासी असून तालुक्यातील प्रथम आदिवासी महिला एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याचे कळते.
हर्षा ची आई ककोडी ता. देवरी जि. गोंदिया येथे हायस्कुल शिक्षिका आहे. हर्षा चे पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण श्रीराम विद्यालय चिचगढ येथे झाले तर पुढील चौथी ते पाचवीचे शिक्षण जि.प.शाळा मसेली, पाचवीचे शिक्षण घेत असतांना नवोदय ची परीक्षा उत्तीर्ण होत पुढील सहावी पासून ते बारावी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय घोट येथे झाले.
इयत्ता बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तिने NEET (२०१७) ची परीक्षा पास होत शासकीय वैयकीय महाविद्यालय गोंदिया येथे २०१७ ला एमबीबीएस (MBBS) तिची निवड झाली. २०१७ पासून गोंदिया येथे शिक्षण घेत नुकतेच तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. ७ जून रोजी तिने आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असून महाविद्यालयातर्फे पदवी बहाल करण्यात आली.
तालुक्यातील पहिली आदिवासी महिला एमबीबीएस (MBBS) चे शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोरची तालुक्यात व बेडगाव येथे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पुढे एमडी मेडिसिन (MD Medicine ) चे शिक्षण घेऊन आरोग्य सेवा द्यायचे असल्याचे The गडविश्व शी बोलताना सांगितले.

Dr. Harsha Uikey

(the gdv, the gadvishva, harsha uikey, bedgao, korchi, MD Medicine, kurkheda, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here