कोरची : चिमुकलीसमोरच कुऱ्हाडीने पत्नीचे मुंडके धडावेगळे करत केली हत्या

2296

– आरोपी पतीस अटक
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा – कोरची, दि. २९ : दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. सुखी संसार सुरू असताना पतीच्या क्रूरतेने चार मुलींचा संसार उघड्यावर आला आहे. कारण कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे पत्नी झोपेत असताना रात्रोच्या सुमारास पतीने तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत मुंडकेच धडावेगळे करून हत्त्या केल्याची घटना समोर आली आहे . या थरारक घटनेने परिसर हादरून गेले आहे. आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अमरोतीन बंझार (३३) असे मृतक महिलेचे नाव असून रोहिदास बंजार ( वय ३८) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००९ ला अमरोतीन आणि रोहिदास यांचा विवाह झाला. त्यांना चार मुली आहे. दोघांचे काही कारणाने सतत भांडण होत असायचे. बेतकाठी येथे मोलमजुरी करून हे जोडपे उदरनिर्वाह करायचे. काल नेहमी प्रमाणे जेवण करून ८ वर्षीय लहान मुलीसोबत मृतक अमरोतीन हे झोपी गेली. दरम्यान पती रोहिदास याने कुठल्यातरी जुना राग मनात धरून आपल्या चिमुकली समोरच पत्नी झोपेत असताना पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून मुंडकेच धडावेगळे करत हत्या केली. ही थरारक घटना त्यांची आठ वर्षीय मुलगी डोळ्याने पाहत होती. घटनेनंतर आरोपी रोहिदास याने कुऱ्हाड लपवून ठेवली मात्र चिमुकल्या मुलीने कुऱ्हाड लपवून ठेवलेले ठिकाण पोलिसांना दाखविले. यावरून पोलिसांनी आरोपी रोहिदास बंजार यास अटक केली आहे. सदर घटनेने मात्र परिसर हादरून गेले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi #kurkheda #crimenews #murder)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here