– प्रवासी सतर्क
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा-कोरची, २१ जुलै: गडचिरोली जिल्हयातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात कुरखेडा मार्ग जायचे म्हटले की बेडगाव घाट पार करून प्रवेश करावा लागतो. मात्र आता या घाटामध्ये एका चारचाही वाहनधारकास चक्क बिबटयाचे दर्शन झाल्याचे कळते. त्यामुळे आता रानटी हत्तीच्या धुडघुस नंतर बिबटया दिसल्याने मात्र प्रवाशात भितीचे वावतावरण आहे.
शिक्षक सुनील नारनरे व कंत्राटदार रामलाल माकडे हे दोघे कोरची येथून कुरखेडाकडे चारचाकी वाहनाने १९ जुलै रोजी निघाले असता बेडगाव घाटाच्या पहिल्या उतारावारील पुलाजवळील रस्त्याच्या मधोमध बिटटयाने ठाण मांडल्याचे दिसुन आले. प्रसांगवधान राखत त्यांनी वाहन थांबवत काही वेळ पाहली. काही वेळाने बिबटया रस्त्यावरून बाजुला बसला. त्यानंतर दोघांनी वाहन बाजुन काढुन पुढे निघाले. यावेळी त्यांनी मोबाईमध्ये चित्रीकरण केले. याचा व्हिडिओ २० जुलै रोजी व्हायरलही झाल्याचे कळते. या मार्गाने प्रवास करणाÚया प्रवाशांना यापुर्वीही बिबटयाचे दर्शन झाले होत. त्यामुळे आता पुन्हा बिबट दिसल्याने मात्र प्रवाशांनी काळजी घ्यावे तसेच एकटयाने प्रवास करून नये, जंगलात रानभाज्या करीता अनेकजण जातात तेव्हाही योग्य काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.