The गडविश्व
गडचिरोली, दि.२९ : आदिवासी एकता युवा समिती गोकुळनगर गडचिरोली यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुकुंदाजी मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी असलेले प्रकाश अर्जुनवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले मुकुंदाजी मेश्राम यांनी सुद्धा त्यांच्या जीवनपटावर ओझरते दर्शन देऊन आम्हाला त्यांचे जीवन व त्यांनी केलेले संघर्ष सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आदिवासी एकता युवा समिती गोकुळनगर चे सचिव प्रदीप कुळसंगे यांनी केले तर आभार मंगेश नैताम यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महत्त्वाचे योगदान अमोल कुळमेथे यांचे होते. तसेच या कार्यक्रमाला संजय मेश्राम, घनश्याम जक्कुलवार, प्रफुल कोडाप, आकाश कोडाप, रोहित अलाम, सुमित अंडेल, मोहम्मद जमशद आणी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.