The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (Kurkheda), ४ डिसेंबर : तालुक्यातील ग्रा.पं.कुंभीटोला करिता भाजपा च्या वतीने सरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
तालुक्यातील कुंभीटोला येथील ग्रा.पं. च्या सरपंच पदासह सदस्य पदाकरिता निवडणूक होणार आहे. याकरिता ग्रा.पं.कुंभीटोला करिता भाजपाच्या वतीने सरपंच पदा करिता ताराबाई मडावी तथा सदस्या पदा करिता अनिकेत तलांडे, प्रियांका जणबंधु, उर्मिला मडावी, कुमार राऊत, अशा गेडाम, मृणाल भांडारकर, हेमंत पोरेटी यांनी शुक्रवार २ डिसेंबर रोजी नामांकन दाखल केले.
यावेळी भायूमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, भायूमो चे विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख नगरसेवक निरंकारि, राकेश भांडारकर, नितीन झोडे, राजू मडावी, सोनाबाई मडावी, जागृती झोडे, श्रीराम कोटनाके, किशोर भांडारकर, चेतन गहाणे उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (BJP Gadchiroli)