– कुरखेडा पोलिसांची कारवाई
-The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १२ जानेवारी : तालुक्यातील कढोली येथे एका व्यावसायीकाच्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू दडवून ठेवण्यात आला असल्याच्या गोपनिय माहीती वरून कुरखेडा पोलिसांनी धाड टाकत ४६ हजार २०० रूपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू जप्त केल्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईने अवैध व्यवसयिकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यायसायीकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात कढोली ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहीती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शितल माने यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने कढोली येथील व्यावसायिक अविनाश आकरे यांच्या घरी धाड टाकली व त्यांचा घरात एका चुंगडीत दडवून ठेवण्यात आलेला ४६ एका हजार २०० रूपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरोधात २७२, २७३,१८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पूढील तपास हवालदार गौरीशंकर भैसारे करीत आहेत.
कुरखेडा तालुक्यात सुगंधित तंबाखुच्या व्यवसायाचे मोठे जाळे निर्माण झाले असून तालूका मूख्यालयात असलेलेले काही मोठे व्यावसायिक या अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांच्या मार्फतच तालुक्याच्या ग्रामीण भागात सुगंधीत तंबाखुचा पूरवठा करण्यात येत असल्याचे बोलल्या जाते.

(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Tiger gadchiroli) (Digital Media ) (Nagpur) (Kurkheda Police)