– प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ३ एप्रिल : शहरातील गांधी चौकातून कुंभिटोलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे मात्र प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहन चालविणे धोक्याचे ठरत आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर अनेकदा अपघात सुद्धा झाले असल्याने गाढ झोपेत असलेल्या प्रशासन याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्यात काय ?असा सुद्धा सवाल नागरिकांकडून करण्यात येत असून या मार्गावरून अनेक विद्यार्थी, नागरिक अवागमन करीत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीता तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)