कुरखेडा भुमि अभिलेख कार्यालय वाऱ्यावर

178

– प्रभारी अधिकारी ३ महिन्यांपासून अनुपस्थित
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा ( चेतन गहाणे), दि. २२ : उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय कुरखेडा येथील प्रभारी अधिकारी मागील ३ महिन्यांपासून कार्यालयाकडे फिरकलाच नसल्याने येथील कारभार वाऱ्यावर दिसून येत असून ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे, जमीनीच्या कामासंदर्भात येणाऱ्या नागरिकांचे कामे रखडत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देत येथील व्यवस्था सुव्यवस्थित चालू करावी अन्यथा विभागाच्या या गलथाण कारभारा विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अनुसूचित जाति आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. उमेश वालदे यांनी पत्रका द्वारे दिला आहे.
शहर वासीय व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा वारंवार होणाऱ्या तक्रारी वरून नुकतीच येथील भुमि अभिलेख कार्यालयाला ॲड. उमेश वालदे यांनी भेट देत येथील कार्यालयीन व्यवस्थेची माहीती जाणून घेतली. यावेळी मोठे विदारक चित्र येथे आढळून आले. येथे मस्टर वर १५ पदे भरण्यात आलेली आहे मात्र प्रत्येक्षात मोजकेच कर्मचारी येथे कार्यरत आढळून आले. येथे कार्यालयीन प्रमूख म्हणून पदस्थ प्रभारी उप अधीक्षक योगेश कांबळे यांची मूळ आस्थापणा जिल्हा कार्यालय गडचिरोली असल्याने ते मागील ३ महिण्यापासून येथील कार्यालयात फिरकलेच नसल्याची माहिती मिळाली, तसेच २ कर्मचारी दिर्घ वैद्यकीय रजेवर, २ प्रतिनियुक्तिवर, २ प्रशिक्षणावर, १ दौऱ्यावर राहत असल्याचे आढळून आले. भुमि अभिलेख कार्यालयाचे अधिकतम कामे ही ऑनलाईन संगणीकृत असते मात्र येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या टेबलावर संगणक तर होता मात्र त्याना लॅपटॉप पुरविण्यात आलेला नाही अशी माहिती मिळाल्याने येथील संगणक हे फक्त शोभेची वस्तू ठरलेले आहेत. ऑफलाईनच येथील कामकाज सुरू असल्याची माहिती यावेळी येथे उपस्थीत कर्मचाऱ्यांनी दिली. येथील या भोंगळ कारभाराचा फटका शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसत सून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. येथील व्यवस्था तातडीने सुव्यवस्थित करण्यात यावी अन्यथा या भोंगळ कारभारा विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ॲड. उमेश वालदे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here