कुरखेडा : कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

863

जखमीस रुग्णालयात नेले दुचाकीवर
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १० : चांदागड वरून कुरखेडाकडे दुचाकीने येत असतांना गोठणगांव नाक्यावरील चौरस्त्यावर दुचाकीची कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार कृष्णा भजने (वय ४०) हा गंभीर झाल्याची घटना हा अपघात आज दि १० मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सूमारास घडली.
कुरखेडा येथील गोठणगाव नाक्यावर असलेल्या चौरस्त्यावर दुचाकीची कारला धडक बसली. यात दुचाकीस्वार कृष्णा भजने हा रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. दरम्यान लगेच नाक्यावरील युवकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकरिता १०७ या टोल फ्री क्रंमांकावर फोन केला असता यावेळी रुग्णवाहिका बाहेर असल्याचे थोडा वेळ लागेल असे सांगण्यात आले. घटनास्थळीअर्धा तास वाट बघुनही रूग्नरुग्णवाहिका न पोहचल्याने अखेर गोठणगांव नाक्यावरील सोहम कावळे, पवन शिडाम, मोहीद शेख, गोलू भांडारकर व अन्य युवकांनी दूचाकीदुचाकीनेच जखमीला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. जखमीला रूग्णालयात पोहचविण्यात आले यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही रूग्णालयातच उभी होती. याची चित्रफीत सूद्धा युवकांनी काढलेली आहे त्यामूळे १०८ क्रमांकाचा रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणीबाणीचा प्रसंगीच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही त्यामुळे येथील त्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जखमी इसमाला दूचाकीने रुग्णालयात आणले तेव्हा १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही रुग्णालयाच्या आवारातच उभी होती त्यावेळचे चित्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here