कुरखेडा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

1451

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : शहरापासून जवळच असलेल्या कढोली मार्गावरील गोठणगांव नाका ते मालदूगी दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६. वाजताच्या सुमारास घडली. रघूनाथ तूलावी (वय ५५ ) रा. मालदूगी असे मृतकाचे नाव आहे.
गोठणगांव नाक्यावर तूलावी हे काही कामानिमित्त आले होते. परत मालदुगी कडे जात असताना त्यांचा दुचाकीला नाकतोडे यांच्या ढाब्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने धडक देत पळ काढला. यात अपघातात तुलावी यांचा जागीच मृत्यू झाला. ते आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगांव येथे संचालक होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे आणले.
कुरखेडा येथील सती नदी वर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने आता या मार्गाने वाहतूक बंद करून गोठनगाव फाटा – मालदुगी – वाघेडा – आंधळी मार्ग वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkheda #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here