– नगरपंचायत कडून घनकचरा उचलणे सुरू
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २२ जून : नगर पंचायत कडून गावातील जमा होणारा घन कचरा येथील सती नदी किनारी पाणीपुरवठा विहिरी नजिक लोक वस्तीला लागून साठवून ठेवला जात होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर कचरा उचलून इतरत्र हलविण्याबाबत अनेक निवेदन आंदोलन येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. नुकत्याच पंचायत समिती येथील आमसभेमध्ये सदर कचरा उचलकरण्या संदर्भात मांडलेल्या विषयास येथील मुख्याधिकारी राजकुमार धानबाते यांनी येत्या ८ दिवसात सदर कचरा उचल केली जाईल अशी ग्वाही दिली होती. पावसाळ्यापूर्वी सदर कचरा उचल करून नगर पंचायत कुरखेडा यांनी नागरिकांना दुर्गंधी पासून मुक्ती देत त्यांच्या आरोग्याला दिलासा दिलेला आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेले शब्द पाडून सदर कचरा उचलण्याचे काम झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसापूर्वी कुरखेडा येथील आमसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात कुरखेडा येथील घनकचरा प्रकरण चांगलाच गाजला होता. कचरा उचल होत असताना औचक निरीक्षण करीत पोहोचलेले आरोग्य व स्वच्छता सभापती अतुल झोडे, गट नेता आशिष काळे, नगरसेवक जयेंद्र चंदेल उपस्थित होते.
(the gdv, the gadvisha, kurkheda ghankachara, gadchiroli news)