– कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत
The गडविश्व
जिल्हा प्रतिनिधी ( चेतन गहाने), दि. ०७ : स्थानिक उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी नीमतानदार 1 हे आज ७ ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असतांना दारूच्या नशेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
संजय भोयर असे दारूच्या नशेत असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा येथे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय असून सदर कार्यालयात आज काही शेतकरी कामानिमित्त भोयर यांच्याकडे गेले असता भोयर हे अती मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता संजय भोयर हे दारूच्या नशेत अधलून आले. यासंदर्भात काही शेतकऱ्यांकडून त्यांना जाब विचारण्यात आला असता त्यांनी कारण देत मी दौऱ्यावर असतो, मला बाहेर फिरावे लागते त्यामुळे मी दारू पितो असे त्यांनी विधान केले आहे.
चक्क अधिकारी हे कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत आढळून आल्याने संजय भोयर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जोर धरत असून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही जिल्ह्यातील अधिकारी वर्गही दारूच्या आहारी गेल्याचे यातून दिसून येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #kurkheda)